नवी दिल्ली, 25 जुलै : समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी आज पुन्हा महिलांचा अपमान करणारं विधान केलं. लोकसभेत भाषण करताना लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांच्याप्रति आक्षेपार्ह शब्द वापरलं. त्यावर त्यांच्यावर सर्वपक्षीय खासदारांकडून जोरदार टीका झाली. पण धक्कादायक बाब म्हणजे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खान यांची पाठराखण केली.