S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड !
  • VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड !

    Published On: Aug 28, 2018 08:50 PM IST | Updated On: Aug 28, 2018 08:50 PM IST

    सागर सुरवसे, पंढरपूर,28 आॅगस्ट : माणसाचं आणि प्राण्यांच्या नात्याच्या अनेक गोष्टी आपण पाहत आलोय अशीच गोष्ट आहे तेजा या श्वानाची...विठ्ठल मंदिरात आल्यावर नचूकता देवा समोर नतमस्तक होणाऱ्या तेजाने काल शेवटचा श्वास घेतला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात गेली नऊ वर्ष कर्तव्य तत्पर सेवा बजावणाऱ्या बॉम्बशोधक पथकातील लब्रोडोर जातीच्या तेजा नावाच्या श्वानाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर आज त्याला शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजाला विशेष कामगिरी साठी 2016 मध्ये गोल्ड मेडल तर 2017 मध्ये सिल्व्हर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले होते. गेली नऊ वर्ष व्हीआयपी बंदोबस्ताला आपले कर्तव्य चोखपणे पार पडणाऱ्या तेजाने काल अखेरचा श्वास घेतला. समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या तेजाला अखेरचा सलाम...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close