• VIDEO : लोकल थांबताच साप आला धावून

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2018 08:56 PM IST | Updated On: Jul 12, 2018 08:56 PM IST

    वसई, विरार आणि नालासोपरामध्ये मागील तीन दिवसांमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. मात्र, या पावसातून सापांनी एकच धुमाकूळ घातला होता. पाण्यातून साप, अजगर हे वाहून अनेक घरांमध्ये शिरले होते. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात थांबलेल्या एका लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने व्हिडिओ रेकाॅर्ड केलाय. या व्हिडिओत एक साप साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत थेट रेल्वे ट्रॅकपर्यंत आला. नंतर तिथेच आणखी एक साप आढळून आला. वसई-विरार आणि नालासोपरा परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये साप आढळून आल्याच्या घटना घडल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी