मुंबई, 08 ऑक्टोबर : युती करण्यासाठी भाजपसमोर झुकलो नाही तर तडजोड करुन वचन पाळलंय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरील दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात विरोधकांना ठणकावलं. भाजपला पाठिंबा द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा असा सवाल करत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. अजित पवारांच्या राजीनामा नाट्याचा समाचार त्यांनी यावेळी केला.