S M L
  • VIDEO: मै हूँ डॉन...शिवेंद्रराजेंचा ठेका !

    Published On: Sep 3, 2018 02:56 PM IST | Updated On: Sep 3, 2018 02:56 PM IST

    03 सप्टेंबर : साताऱ्याचे खासदार उदयनराजे डान्स करताना अनेकांनी पाहिले आहे मात्र आमदार शिवेंद्रराजे जाहीरपणे डान्स करताना कुणी पाहिले नव्हते. चाहत्यांची ही इच्छा आमदार शिवेंद्रराजे यांनी पूर्ण केली आहे. गांधी मैदानावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरवलेल्या छत्रपती दहीहंडी महोत्सवात शिवेंद्रराजे यांनी बेभान होऊन डान्स केला. तरुणांच्या तोबा गर्दीत सुरू झालेल्या या महोत्सवात मैं हु डॉन ,शहेंनशहा ,मारहाब्बा या गाण्यावर शिवेंद्रराजे भन्नाट नाचले. त्याला तरुणांनीही चांगली दाद दिली. जादूची झप्पी देऊन शिवेंद्रराजे नाचत होते ते पाहताना तरुणांमध्येही उत्साह संचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close