बारामती, 14 सप्टेंबर : उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी साताऱ्यात पोहोचले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये कमराबंद चर्चा झाली. परंतु, शिवेंद्रराजे यांनी ही भेट औपचारिक होती, असं सांगितलं.