• होम
  • व्हिडिओ
  • सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंची हुक्का पार्लरवर कारवाई, LIVE व्हिडिओ
  • सिंघम अधिकारी शिवदीप लांडेंची हुक्का पार्लरवर कारवाई, LIVE व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Oct 20, 2018 10:01 PM IST | Updated On: Oct 20, 2018 10:06 PM IST

    दिवाकर सिंग,मुंबई 20 आॅक्टोबर : मुंबई पोलिसांचे दबंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी आणखी एक धडाकेबाज मोहीम फत्ते केलीये. अँटी नार्कोटिक्स सेलने क्रॉफर्ट मार्केटमध्ये एका हुक्का पार्लरवर मोठी कारवाई केली.शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाड टाकली. महाराष्ट्रात हुक्काबंदी लागू झाल्यानंतरही बेकादेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. पोलिसांनी धाड टाकून 30 हुक्का पॉट्स,अनेक हुक्का फ्लेवर्स आणि 38 पाईप्ससह इतर साहित्य जप्त केले. पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक, मॅनेजर आणि तीन वेटरला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी