निलेश पवार (प्रतिनिधी)नंदुरबार, 13 नोव्हेंबर: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्यानं कार्ली इथल्या एका शिवसैनिकानं थेट टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे. सेना-भाजपनेच सत्ता स्थापन करावी अशी मागणी या शिवसेना कार्यकर्त्यानं केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत संभाषण झाल्याशिवाय टॉवरवरून खाली उतरणार नाही अशी शिवसेना कार्यकर्ते तुकाराम पाटील यांनी ठाम भूमिका घेतली आहे.