• लोकवस्तीजवळ आढळला १० फुटांचा अजगर!

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2018 06:47 PM IST | Updated On: Nov 8, 2018 06:49 PM IST

    हरीष दिमोटे, अहमदनगर, 08 नोव्हेंबर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात एक भला मोठा अजगर आढळला. सर्पमित्र आणि गावकऱ्यांनी या अजगराला पकडून जंगलात मुक्त केलंय. संगमनेर तालुक्यातील बोरबन गावात हा अजगर आढळला. एका तरूणाला रस्त्यावर हा भला मोठा अजगर दिसल्यानंतर सर्पमित्राला बोलावून गावकरी आणि सर्पमित्राने या अजगराला पकडून सुखरुप जंगलात सोडून दिलंय. साधारणपणे या परिसरात कधीही अजगर दिसत नाही त्यामुळे ह्या अजगराला पाहून नागरीक भयभीत झाले होते त्यातच जवळच लोकवस्ती असल्याने हा अजगर तिथंही गेला असता तर नागरीकांची धांदल उडाली असती. सुदैवाने त्याला ग्रामस्थांनी जिवदान दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading