• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली
  • VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2018 05:46 PM IST | Updated On: Aug 6, 2018 05:46 PM IST

    मुंबई, 6 ऑगस्ट : एका महिलेन आपल्या मुलीसह रेल्वेच्या खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज (सोमवार) भाईंदर रेल्वे स्थानकावर घडलाय. दुपारी 12:17 वाजता ही घटना घडली असून महिलेने प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील लोकलच्या खाली येऊन आत्महत्या काली. रेणुका पिंटु (वय 24) असे या मृत महिलेचे नाव होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुरूवातीला ती महिला आपल्या मुलीसह भाईंदर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभी होती. प्लॅटफॉर्मवर चर्चगेटला जाणारी लोकल येत असल्याचे दिसताच आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला कवटाळून ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली. हे दृष्य पाहून रेल्वेचालकाने लोकल थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तोपर्यंत खुप ऊशीर झाला होता. महिलेच्या अंगावरून गेली होती. रेल्वे त्यांच्यावरून गेल्याने माय-लेकीचा करुण अंत झाला. दोघींच्याही शरिराचे तुकडे झाले होते. ही महिला हनुमान नवीर गावदेवी चाळ रूम न. 06 नवघर रोड भायंदर पूर्व येथे रहात होती अशी माहीती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी