S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रचाराच्या धामधुमीनंतर शरद पवार पोहोचले चारा छावणीत, केली 'ही' मागणी
  • VIDEO : प्रचाराच्या धामधुमीनंतर शरद पवार पोहोचले चारा छावणीत, केली 'ही' मागणी

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 09:02 PM IST | Updated On: Apr 30, 2019 09:02 PM IST

    सोलापूर, 30 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार आज सोलापुरातील सांगोल्यात होते. यावेळी त्यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यलमार मांगेवाडीतल्या ग्रामस्थांनी यावेळी जनावरांचं दूध किती घटलंय याची आकडेवारीच सांगितली. या गावातलं दूध संकलन दुष्काळामुळे 2 हजार लिटरवरुन थेट 200 लिटरवर आलं आहे. त्यात सध्या दुष्काळी चारा छावण्यांमध्ये एका कुटुंबातल्या फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश दिला जात आहे. ही अट काढून टाकावी, तसंच पंधरा किलोपेक्षा जास्त चारा मिळावा, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी पवारांकडे केल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close