S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला क्षणात चितपट करणारी 'दंगल गर्ल'
  • VIDEO : कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला क्षणात चितपट करणारी 'दंगल गर्ल'

    Published On: Dec 6, 2018 07:35 PM IST | Updated On: Dec 6, 2018 07:54 PM IST

    सातारा, 6 डिसेंबर : कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला क्षणात चितपट करणारी हि 'दंगल गर्ल' आहे आर्वीची सुर्वणकन्या स्मृती येवले. साताऱ्याच्या ग्रामीण भागातील आर्वी या दुष्काळी गावातील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या स्मृती येवले हिने राज्यपातळीवर पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. नागवेली पानांसाठी देशात प्रसिद्ध असलेलं कोरेगाव तालुक्यातील हे गाव. आमिर खानच्या 'दंगल' या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात महिला कुस्तीला चांगले दिवस आल्याचं चित्र बघायला मिळतंय. नुकत्याच पार पडलेल्या राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत अंतीम सामन्यात 13 वर्षीय स्मृतीनं औरंगाबादच्या नीता पाटील हिला अवघ्या 53 सेकंदात चितपट केलं आणि सुवर्ण पदक मिळवलं. स्मृतीच्या या सुवर्ण कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. पाहुया स्मृती येवलेची यशोगाथा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close