• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : ध्यास अवयव दानाचा; देणगी पुर्नजन्माची
  • Special Report : ध्यास अवयव दानाचा; देणगी पुर्नजन्माची

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 10:01 PM IST | Updated On: Jan 28, 2019 07:09 PM IST

    बारामती, 27 जानेवारी : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अवयव दानाचं महत्व कैक पटीनं वाढलं आहे. लोकांना अवयवदानाचं महत्त्व पटावून देण्यासाठी सांगलीच्या एका 67 वर्षांच्या प्रमोद महाजन या चिरतरुणानं अवयवदानाचा वसा हाती घेतला आहे. अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईकवर स्वार होऊन त्यांनी 100 दिवस 10 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 18 वर्षापूर्वी सैन्यातील जवान मित्राला किडनी दान करुन प्रमोद यांनी अवयदानाचा आदर्श घालून दिला. धकाधकीच्या जीवनात जिथं आयुष्याची रोज कसोटी लागते तिथं सांगलीचे प्रमोद महाजन पीडितांसाठी ऑक्सिजनचं काम करताहेत. या नश्वर देहाची चितेमध्ये राखरांगोळी करण्यापेक्षा, एखाद्याला पुर्नजन्माचं सुख मिळवून देण्यातच खरं पुण्य असल्याचा अमूल्य संदेश ते आपल्या परिक्रमेतून देताहेत. पीडितांच्या शरीरात पुन्हा प्राणवायू फुंकणाऱ्या या अवलियास न्यूज18 लोकमतचा सलाम. पाहुया आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांचा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading