• 'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2018 11:55 PM IST | Updated On: Aug 31, 2018 11:55 PM IST

    सरकारविरोधात काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे.जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आजपासून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मल्लीकर्जून खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते या जनसंघर्ष यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. यात्रेनंतर झालेल्या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी डाॅ.नरेंद्र दाभोलकर, काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन सारख्या संस्थेवर बंदी घातलीच पाहिजे, सरकार निव्वळ आव आणत आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading