इंदूर, ३१ मार्च- सलमान खान... या नावातच सारं काही येतं. फक्त भारतातच नाही तर जगभरात या सुलतानचे चाहते आहेत. म्हणूनच तो कुठेही जातो तेव्हा त्याच्यासोबत स्वतःचा ताफा घेऊन जातो. नुकताच सलमान दबंग ३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी इंदूरला गेला. यावेळी एअरपोर्टमधून बाहेर पडण्यापूर्वी त्याच्या अंगरक्षकांनी अशी काही तयारी करून ठेवली होती की उपस्थितांना नक्की कोण येतंय याचंचं कुतूहल जास्त होतं.