साधू महाराज रॉक्स पब्लिक शॉक्स! रॉक संगितावर साधू महाराजांचे देशी ठुमके पाहा VIDEO
Viral Video: एका साधूने (Monk) आधुनिकतेला आपलंस करत रॉक संगितावर (Rock music) देशी ठुमके (Deshi Dance) मारले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबई, 07 जानेवारी : भारतीय संस्कृतीला साधू संताचा खुप मोठा वारसा आहे. साधू महाराजांची पूजा करणारा, त्यांना मानणारा एक खुप मोठा वर्ग आपल्या भारतात राहतो. आपण नेहमीचा साधूंना धार्मिक विधी करताना किंवा धार्मिक गीतं म्हणताना पाहिलं आहे. जास्तीत जास्त एखाद्या भजनावर नाचताना पाहिलं असेल. पण एका साधूने आधुनिकतेला आपलंस करत रॉक संगितावर देशी ठुमके मारले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
साधू महाराजांनी रॉक संगितावर डान्स केल्यानंतर लोकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडिओ अजमेर येथील पुष्करचा असल्याचं म्हटलं जात आहे. @DoctorAjayita नावाच्या एका ट्वीटर युजरने हा व्हिडिओ मंगळवारी शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं की- साधू महाराज रॉक्स !! बातमी लिहिण्यापर्यंत हा व्हिडिओ 65 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला होता. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला होता. या साधू महारांजांच्या डान्स बघून अनेकांनी एक से बडकर एक कमेंट करायाला सुरुवात झाली आहे.
साधारणतः एक मिनिटाच्या या व्हिडिओत एक परदेशी नागरिक इलेक्ट्रिक गिटार वाजवत दिसत आहे. लोकांनी त्याची धुन ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. यावेळी या साधू महाराजांनी रॉक संगिताच्या गाण्यावर डान्स केला आहे. त्यामुळे रॉक संगित आणि देशी डान्स यामुळं हा व्हिडिओ भन्नाट बनला आहे. हे संगित आणि डान्सच्या या अजब मिश्रण नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.
यावेळी तेथिल उपस्थित असणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. यातीलच एका ट्वीटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. साधू महाराजांनी अशाप्रकारे पाश्चात्य संगितावर डान्स करणं जमलेल्या लोकांसाठी नवीन होतं. त्यामुळं हे दृष्य 'साधू महाराज रॉक्स पब्लिक शॉक्स' असंच काहीसं होतं.