मुंबई, 30 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच एखादे ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. याबाबत स्वतः आदित्य ठाकरेंनीच घोषणा केली. शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी घोषणा केली.वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. वरळीतून आमदार राहिलेले सचिन अहिर यांनी यावर प्रतिक्रिया दिली.