• VIDEO : या अपघातामुळं भारताला मिळाला रो'हिट' !

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 07:00 PM IST | Updated On: Apr 30, 2019 07:20 PM IST

    मुंबई, 30 एप्रिल : भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा अपघाताने फलंदाज झाला आहे.रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. रोहित शर्मा भारताच्या ज्युनिअर संघात क्रिकेट खेळत होता. 2005 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. त्यावेळी गोलंदाज म्हणून त्याची कारकिर्द संपुष्टात आली. गोलंदाजी करायला अडचण आल्यानंतर रोहितने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर मात्र, रोहितने मागे वळून पाहिलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी