रत्नागिरीतल्या झरेवाडीतला भोंदूबाबा काही तासातच मोकाट !

रत्नागिरीतल्या झरेवाडीतला भोंदूबाबा काही तासातच मोकाट !

रत्नागिरीतील भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटील याचे एका पाठोपाठ एक कारनामा उघड होऊ लागले आहेत. काल एका महिलेच्या तक्रारीनंतर या भोंदू बाबाला अटक करण्यात आली होती. मात्र आज न्यायालयाने 15 हजारांच्या जामिनावर त्याची सुटका केलीय. पण लोकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी आता जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या बाबावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

  • Share this:

 रत्नागिरी,21 सप्टेंबर : रत्नागिरीतील भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटील याचे एका पाठोपाठ एक कारनामा उघड होऊ लागले आहेत. काल एका महिलेच्या तक्रारीनंतर या भोंदू बाबाला अटक करण्यात आली होती. मात्र आज न्यायालयाने 15 हजारांच्या जामिनावर त्याची सुटका केलीय. पण लोकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी आता जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या बाबावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. त्यामुळे या बाबाला पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता आहे. या भोंदूबाबाच्या विरोधात अनेक महिला तक्रारदार पुढे येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील झरेवाडी गावातला हा भोंदूबाबा स्वतःचा मठही चालवतो. दर गुरूवारी या मठात तो वारीच्या नावाखाली स्वतःचा दरबारही भरवतो. श्रीकृष्ण पाटील असं त्याचं खरं आहे. पूर्वी तो पोलीस खात्यात साधा चालक म्हणून नोकरी करत होता. दिवसा नोकरी आणि रात्री वारी असे उद्योग करून तो भलताच फेमस झाला. अल्पावधीतच त्याने स्वतःचा भक्तगणही तयार केला. भक्तीच्या नावाखाली महिला भक्तांचे हात पकडणे त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करणे असे त्याचे उद्योग सुरू होते. तो स्वतःला स्वामी समर्थांचा अवतार म्हणवतो. रत्नागिरी सारख्या मोक्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून तो भाबड्या भक्तांना लुबाडण्याचं काम करत होता. हा बाबा स्वत:ला देवाचा अवतारही म्हणवून घेतो.

काही महिलांनी या बाबाविरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने देखील त्याच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आता या भोंदू बाबाविरूद्ध काय कारवाई होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. यूट्यूबवर त्याने स्वतःच्या प्रचाराचे काही व्हिडिओही अपलोड केलेत. दरबारात तो उघडा होऊन उडत्या चालींच्या भजनांवर डान्सही करतो आणि भक्तांवर पेढेही उधळतो...

या भोंदूबाबाचे कारनामे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा...

First published: September 21, 2017, 8:38 PM IST

ताज्या बातम्या