• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राजू शेट्टींची जानकरांसोबत पुण्यात बैठक; म्हणाले, 'आघाडीने लवकर कळवावे'
  • VIDEO : राजू शेट्टींची जानकरांसोबत पुण्यात बैठक; म्हणाले, 'आघाडीने लवकर कळवावे'

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 07:38 PM IST | Updated On: Mar 12, 2019 07:38 PM IST

    12 मार्च : राज्यात चौथ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांची एका हाॅटेलमध्ये बैठक झाली. शेट्टींची आघाडीसोबत तडजोड न झाल्यास आणि जानकरांना युतीमध्ये योग्य वाटा न मिळाल्यास हे दोघं एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आघाडीनं काँग्रेसला अल्टिमेटम दिलं आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे शेट्टींनी माढ्याची जागा मागितल्यानं काँग्रेसपुढचा पेच आणखी वाढला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत माढ्याची जागा राष्ट्रवादीच्या खात्यात आहे. त्याचसोबत शेट्टींनी वर्धा आणि बुलडाण्याच्या जागांची मागणी केली. मागितलेल्या जागा न दिल्यास 16 जागांवर उमेदवार देण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading