• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी हे तर खोटारडे; शेवटी गडावरचा गडकरी महत्त्वाचा - राज ठाकरे
  • VIDEO : मोदी हे तर खोटारडे; शेवटी गडावरचा गडकरी महत्त्वाचा - राज ठाकरे

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 01:45 PM IST | Updated On: Feb 4, 2019 02:01 PM IST

    राळेगणसिद्धी, 04 फेब्रुवारी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रपरिषद घेऊन दोघांमध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. ''मोदी स्वतः खोटारडे आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावू नका'', हे सांगतांना गडावरचा गडकरी देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी सरकार ढोंगी आहे. कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले आणि त्यांनाच विसरले,अशी चपराक यावेळी राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारलाआणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली. आपण एकत्र येऊ यांना गाडून टाकू असंही यावेळी राज म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी