• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : वरपित्याच्या भूमिकेत राज ठाकरे पोहोचले 'मातोश्री'वर
  • Special Report : वरपित्याच्या भूमिकेत राज ठाकरे पोहोचले 'मातोश्री'वर

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 07:40 PM IST | Updated On: Jan 5, 2019 07:42 PM IST

    मुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरपित्याच्या भूमिकेत 'मातोश्री'वर पोहोचले. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते. राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. दोघा भावांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. राज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा 27 जानेवारीला विवाह होणार आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे मुलाच्या लगीनघाईमध्ये व्यस्त आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी