S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • News18 Lokmat Impact : 35 दिवसांत उभी राहणार राहीबाईंची देशी बियाणं बँक
  • News18 Lokmat Impact : 35 दिवसांत उभी राहणार राहीबाईंची देशी बियाणं बँक

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 04:25 PM IST | Updated On: Jan 14, 2019 04:36 PM IST

    अहमदनगर, 14 जानेवारी : बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणं बँकेच्या पायाभरणीचा समारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावी पार पडला. News 18 लोकमतच्यावतीनं घेण्यात आलेल्या 'सन्मान बळीराजाचा' या कार्यक्रमात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंना आंतरराष्ट्रीय दर्जाची बियाणं बँक बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आता प्रत्यक्षात येणार आहे. हे बांधकाम 35 दिवसांत पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. 2500 चौरस फुटांच्या जागेत बिज बँक, गेस्ट रूम आणि राहिबाईसाठी घर राहणार आहे. या बांधकामासाठी पन्नास लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. या पायाभरणी समारंभाला महसूलमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, बांधकाम विभाग अधिकारी आणि News 18 लोकमतचे अधिकारी उपस्थित होते. यानिमित्तानं News 18 लोकमतच्या पाठपुराव्याला मोठे यश आलं आहे...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close