• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा LIVE VIDEO
  • पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 09:14 PM IST | Updated On: Sep 12, 2019 09:41 PM IST

    पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यातील पाचही मानाच्या बाप्पांनी निरोप घेतला आहे. मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपतीचं मोठ्या थाटात विसर्जन पार पडलंय. तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचंही जल्लोषात विसर्जन सोहळा पार पडला. या वेळी बाप्पाचा नावाचा एकच जल्लोष पहायला मिळाला. तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालिम बाप्पाचंही विसर्जन झालं. तर चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा गणपतीही विसर्जित झाला आहे. दरम्यान सकाळपासूनच विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी पुणे पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी