• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल-प्रियांकांचा भाजपवर हल्लाबोल
  • VIDEO : मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल-प्रियांकांचा भाजपवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 10:37 PM IST | Updated On: Mar 12, 2019 10:37 PM IST

    12 मार्च : देशात काँग्रेसचं सरकार आलं तर जीएसटीचा फेरआढावा घेऊन एकच कर आमलात आणेल असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी दिलं. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये आज राहुल आणि प्रियंका गांधींनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदींवर हल्लाबोल करत जनतेला अनेक आश्वासनं दिली. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही याचं दु:ख असल्याचं सांगत असतानाच काँग्रेसचं सरकार आल्यावर शेतकरी आणि गरिबांना काँग्रेस गॅरण्टीड मिनिमम इन्कम देईल, प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करेल अशी आश्वासनं दिली. यावेळी राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अजहरच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदींवर टीकेचे बाण सोडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी