मोशे म्हणाला मोदींना, 'डिअर मोदी आय लव्ह यू, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 08:43 PM IST

मोशे म्हणाला मोदींना, 'डिअर मोदी आय लव्ह यू, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत'

जेरूसलेम, 5 जुलै : इस्त्रायल दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 26/11च्या हल्ल्यातील पीडित मोशे होल्टझेबर्गची भेट घेतली. यावेळी मोदींनी त्याला भारतात येण्यासाठी जास्तीत जास्त दिवसांचा व्हिसा देण्याचं वचन दिलंय. तसंच पंतप्रधान नेत्यनाहू भारत दौऱ्यावर येतील तेव्हा मोशे त्यांचासोबत असणार आहे.

मोदींनी त्याच्या जेरुसलेमधील घरी जाऊन भेट घेतली. मोशे आता 11 वर्षांचा झालाय. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी मोशे छाबडा हाऊसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. या हल्ल्यात मोशेचे कुटुंबीय ठार झाले होते तर मोशे सुदैवाने वाचला होता. नंतर त्याच्या आजोबांनी मोशेला जेरुसलेमला नेलं होतं.

त्याच मोशेची पंतप्रधान मोदींनी इस्त्रायल दौऱ्यादरम्यान आवर्जुन भेट घेतलीय. यावेळी मोशेनं मोदींना एक भेट कार्ड दिलं. तो म्हणतो, 'मिस्टर मोदी, आय लव्ह यू आणि भारतीय...आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहिल" असं म्हणून त्याने उपस्थितांची मन तर जिंकलीच मोदींनी त्याला जवळ घेऊन कवटाळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2017 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...