• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक; दोन दिवसानंतर होता विवाह सोहळा
  • VIDEO : गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर जळून खाक; दोन दिवसानंतर होता विवाह सोहळा

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 11:26 PM IST | Updated On: Dec 3, 2018 11:26 PM IST

    परभणी, 3 डिसेंबर : शहारातील वांगीरोड परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 2 घर जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परभणी शहरातील वांगीरोड परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, झाल्याने दोन घर जळून खाक झाले असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दुपारी तीनच्या सुमारास वांगीरोड परिसरातील स्वछता कॉलनीत , गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने सचिन आदोळे, आणि कैलास वाघमारे यांच्या घराला भीषण आग लागली. या आगीत दोन्ही घर जळून खाक झाली. सचिन आदोळे यांच्या घरी दोन दिवसानंतर बहिणीचा विवाह सोहळा होता. या आगीत लग्नाचं सगळं सहित्य जळून खाक झाल्यामुळे त्यांच्यासमोर नवीनच संकट उभं राहिलं आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. दरम्यान, परिसरात नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी