नवी दिल्ली, 23 जुलै : आता यापुढे सीटबेल्ट नाही लावला तर गाडीत सायरन वाजणार आहे. होय, सरकार तसा नियमच बनवणार आहे. म्हणजे, सीटबेल्ट लावला नाही तर सर्व गाड्यांमध्ये सायरन वाजण्याची प्रणाली कंपन्यांना बसवावी लागणार आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत ही घोषणा केली. तसंच, दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तर गाडी सुरूच होणार नाही अशीही प्रणाली भविष्यात आणली जाणार आहे, असंही गडकरी म्हणाले.