मोदी सरकारच्या आधीच 94 टक्के गावात वीज पोहोचली ?

मोदी सरकारच्या आधीच 94 टक्के गावात वीज पोहोचली ?

अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्या यांनी टि्वट करून सरकारच्या आकड्यांनुसार 2013 पर्यंत 94 टक्के गावात वीज पोहोचली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : मणिपूरचं लिसांग गावासह देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या अहवालाच लिसांग हे गाव शेवटचं गाव आहे जिथे वीज पोहोचलीये. पण मोदी सरकारच्या आधीच 94 टक्के वीज पोहोचल्याची बाब समोर आलीये.

28 एप्रिलला ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी याबद्दल अधिकृत घोषणाही केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचं लक्ष्य पूर्ण झालंय असं गोयल म्हणाले.

टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार,  97 टक्के गावांमध्ये आधीच वीज पोहोचली आहे. यूपीए सरकारने 79 ते 94 टक्के गावांमध्ये वीज पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.

अर्थतज्ज्ञ रूपा सुब्रमण्या यांनी टि्वट करून सरकारच्या आकड्यांनुसार 2013 पर्यंत 94 टक्के गावात वीज पोहोचली होती. मोदी सरकारने फक्त 6 टक्के गावात विज पोहोचवली असा दावा त्यांनी केला.

First Published: Apr 30, 2018 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading