नवी दिल्ली, 6 मार्च : दिल्लीतल्या CGO कॉ़म्प्लेक्समधील पंडीत दीनदयाल अंत्योदय भवनच्या पाचव्या माळ्याला भीषण आग लागली आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास ही आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. अग्निशमन दलाचे 25 बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचं कार्य युद्ध स्तरावर सुरू आहे. पाचव्या मजल्यावर कुणी अडकलंय का याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. BSF, CBI, CRPF यांसह केंद्र सरकारचे अनेक महत्त्वाचे कार्यालय या कॉ़म्प्लेक्समध्ये आहेत.