• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : उदयनराजे की शिवेंद्रराजे; कोणाला मिळणार 'पॉवर'?
  • Special Report : उदयनराजे की शिवेंद्रराजे; कोणाला मिळणार 'पॉवर'?

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 08:57 PM IST | Updated On: Jan 27, 2019 08:57 PM IST

    सातारा, 27 जानेवारी : लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांनी साताऱ्याच्या दोन्ही राजेंचं मनोमिलन घडवून आणलंय. दस्तुरखुद्द पवारांनी या दोघांना एकाच गाडीत बसवून आणलं. एका रुग्णालयाच्या उद्घाटनाचं निमित्त असलं तरी पवारांनी यावेळी फक्त एकच अजेंडा डोक्यात ठेवला, तो म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्र राजेंचं मनोमिलन घडवून आणणं. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दोन्ही राजे आपल्या आजुबाजुलाच कसे राहतील याची विशेष काळजी यावेळी पवारांना घेतली. झेंडा वंदन, फित कापताना, नाष्ट्याच्या टेबलजवळ हे दोन्ही राजे एकमेकांच्या शेजारीच उभे होते. राष्ट्रवादीचं तिकीट कन्फर्म करत नाही म्हणून मध्यंतरी उदयनराजे थेट भाजपच्या स्टेजवर जाऊन आले होते. तिथं त्यांनी चक्क भाजप सरकारचं कौतुक करून राष्ट्रवादीला योग्य तो संदेशही दिला होता. त्यानंतर उदयन राजेंच्या दबावतंत्राला प्रत्युत्तर म्हणून पवारांनी दोन्ही राजेंचं आज मनोमिलन घडवून आणलं. यामुळे उदयन राजेंचं तिकीट नक्की म्हणायचं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर या मनोमिलनातून पवारांनी उदयनराजेंच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading