• Special Report : माढ्याचा तिढा, पवारांचा विडा!

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 03:13 PM IST | Updated On: Feb 10, 2019 03:16 PM IST

    राजकारणात कोणी कोणाचं नसतं असे म्हंटले जाते. त्याचीच प्रचिती सध्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना येत आहे. शरद पवार मढ्यातून निवडणूक लढण्याची शक्यता असल्यामुळे मोहिते पाटील आता बंडाचे निशाण फडकवणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. पक्षातल्या गटबाजीमुळे 2009 साली विजयसिंह मोहिते पाटलांचा पंढरपुरात झालेला पराभव हा त्यांचे खच्चीकरण करणारा ठरला. तरीही 2014 मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही मोहिते-पाटलांनी गटतट बाजूला ठेवत माढ्यात राष्ट्रवादीची लाज राखली. मात्र आता खुद्द शरद पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षेनं मोहिते पाटलांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी