पुणे, 14 डिसेंबर : राष्ट्रवादीचा मेळावा आज पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. या मेळाव्यात छोटा बुके दिल्यावरून अजितदादांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांची भरसभेत चांगलीच खेचली. एवढुसा बुके द्यायला तुला शोभत नाही. जरातरी पदांचा मान ठेवा बेट्यानो, असं म्हणत अजितदादांनी एकच धुराळा उडवून दिला. तसंच सत्ता आली म्हणून लगेच शिरजोरी सुरू करू नका, नियमानेच वागा, अशी कानउघडणीही अजित पवारांनी केली.