त्रंबकेश्वर, 07 जून : नाशिकमधील त्रंबकेश्वर दशक्रिया सिनेमातील दृश्य प्रत्यक्षात पाहण्यास मिळाला. पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितामध्ये गेल्या काही दिवसांपासून पूजा करण्यावरून वाद पेटला होता. अखेर आज या दोन गटांमधील पुरोहितांनी एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिव्या देत मारामारी केली. अखेर हा वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे.