• VIDEO: ...आणि ट्रेकर्सची बिकट वाट झाली मोकळी

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 03:02 PM IST | Updated On: Mar 6, 2019 03:43 PM IST

    नाशिक, 6 मार्च : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळचा हरिहर किल्ला हे ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण. ट्रेकर्स मोठ्या संख्येनं या किल्ल्यावर येत असतात. पण या किल्ल्याच्या वाटेवर मधमाशाचं पोळं लागलं आणि इथे येणाऱ्या ट्रेकर्सची आणि पर्यटकांची वाट बिकट झाली. एका बाजूला खोल दरी, तर दुसऱ्या बाजूला उंच कडा आणि मधोमध मधमाशाचं पोळं अशा कात्रीत इथे येणारे ट्रेकर्स अडकले. याबाबत 'रानवाटा' या दुर्गभ्रमंती करणाऱ्या गिर्यारोहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती व्हायरल केली. त्यानंतर पुण्यातील 'शिखर फाऊंडेशन अॅडव्हेंचर क्लब' आणि मधमाशांचं संवर्धन करणारी संस्था 'बी बास्केट' पर्यंटकांच्या मदतीसाठी धावून आली. या दोन्ही संस्थांनी मिळून हरिहर किल्ल्याची वाट मोकळी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading