• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल
  • VIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2018 06:17 PM IST | Updated On: Nov 12, 2018 08:03 PM IST

    नाशिक, 12 नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमधील नौसेरा सेक्टरमध्ये काल पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारात केशव गोसावी जखमी झाले होते. त्यांनंतर सैन्याच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. 29 वर्षीय केशव हे मुळचे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपुरचे रहिवासी होते. त्यांचं पार्थिव नाशिक इथं आणण्यात येणार आहे. दरम्यान, सीमेवर फक्त गोरगरिबांच्या मुलांनीच का मरायचं, पुढारी आणि अधिकाऱ्यांची मुलं कधी सैन्यात भरती होणार, असा उद्विग्न सवाल शहीद जवान केशव गोसावी यांच्या मामांनी उपस्थित केलाय. पाककडून झालेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या केशव सोमगिर गोसावी या जवानाला वीरमरण आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी