Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी
  • VIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2018 10:16 PM IST | Updated On: Sep 23, 2018 10:24 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 23 सप्टेंबर : हायकोर्टाच्या आदेशानूसार संपूर्ण महाराष्ट्रात डीजेच्या आवाजावर बंदी घालण्यात आली असतांनाच सत्ताधारी भाजपचे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय नाशिक पूर्व आमदार आणि भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब आमदार यांच्याच तपोवन परिसरातील तपोवन मित्र मंडळातर्फे डीजे साउंड सिस्टीम लावण्यात आलीय. नाशिकच्या इतर कुठल्याही मंडळातर्फे डीजे लावण्यात आला नसून दुसरीकडे मात्र हे चित्र बघायला मिळतंय. एवढंच नाही तर प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकमध्ये गुलालाचा वापर करण्यात आला नसून इथं मात्र गुलालाची उधळण केली जातीय. त्यांचे सुपुत्र भाजप नगरसेवक मछिन्द्र सानप हे स्वतः ईथे डिजेवर नाचतायत. यावेळी डीजेसमोर तरुणाची सिनेस्टाईल मारामारी झाल्याची घटना घडलीये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com