S M L
  • पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला सीसीटीव्हीत

    Published On: Jul 10, 2018 11:48 PM IST | Updated On: Jul 10, 2018 11:48 PM IST

    नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. इंदिरानगर परिसरात एका लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला चढवत तिच्या अंगावर तब्बल 22 ठिकाणी चावा घेतला. ह्या घटनेनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे. ही मुलगी इंदिरानगर भागातून घरी जात असताना, कुत्र्याने मागून तिच्यावर हल्ला चढवत तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला. यात ती गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी मुलीची कुत्र्यापासून सुटका केली. मुलींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सिडको भागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडत 15 ते 20 जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. शहरात 65 हजार मोकाट कुत्रे असून ह्यातील अनेक कुत्र्यांचा निर्बीजकरण झाले नाहीय,त्यामुळे दिवसंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असून ह्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close