नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. भाजपच्या नगरसेवकांडून उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंढेविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार होता.मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं असं कोणतही पत्रक अध्यापतरी आपल्याकडं आलं नसल्याचं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय.