मनमाड, 8 मे: बस चालवताना मोबाईल वापरण्यास बंदी असली तरी काही एसटी चालक या नियमाकडे सतत दुर्लक्ष करतात. नाशिक ते साक्री एसटी चालकानं प्रवासात एकूण तीन वेळा मोबाईल वापरल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे तब्बल 50 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. MH 20 BL 3482 या बसमध्ये हा प्रकार घडला.