• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये आषाढीनिमित्त निघालेल्या सायकल वारीला लागबोट
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये आषाढीनिमित्त निघालेल्या सायकल वारीला लागबोट

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 05:09 PM IST | Updated On: Jun 28, 2019 05:11 PM IST

    नाशिक, 28 जून : आषाढीनिमित्त शुक्रवारी नाशिकमध्ये निघालेल्या सायकल वारीला गालबोट लागलं. प्रेम नाफडे या अवघ्या दहा वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. प्रेम सायकल वारीत सहभागी झाला होता. गोल्प क्लब मैदानातून ही सायकल रॅली सकाळी निघाली. सुमारे सातशे जण या वारीत सहभागी झाले होते. या वारीत पहिल्यांदाच मुलं सहभागी झाले होते. प्रेमही उत्साहानं वारीत सहभागी झाला होता. मात्र, वाऱ्याच्या वेगानं त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी काळानं डाव साधला. मागून आलेल्या ट्रकनं प्रेमला चिरडलं. जखमी झालेल्या प्रेमला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी