• Special Report : नाराण राणे IN, शिवसेना OUT

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 10:32 PM IST | Updated On: Jan 6, 2019 10:32 PM IST

    एकीकडे अमित शाह यांनी युतीसंदर्भात स्फोटक विधान केलं असतानाच, युतीत खोडा घातला जाईल असा एक निर्णय भाजपकडून घेण्यात आलाय. कारण युतीला तीव्र विरोध करणाऱ्या नारायण राणे यांना भाजपनं जाहीरनामा समितीत स्थान दिलं आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ''शिवसेनेशी युती केल्यास मी भाजपची साथ सोडेन'', असा इशारा नारायण राणेंनी दिला होता. त्यामुळं नारायण राणेंना जाहीरनाम्यात स्थान देऊन भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण राणेंची नाराजी दूर करताना भाजपनं शिवसेनेला देखील युतीसंदर्भात स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जातंय. पाहुया यासंदर्भात नारायण राणे काय म्हणाले...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी