• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला
  • VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2018 11:12 PM IST | Updated On: Aug 24, 2018 11:12 PM IST

    नांदेड, 24 आॅगस्ट : कुत्रा घराचा राखणदार आणि सगळ्यात प्रामाणिक प्राणी समजला जातोय. पोलीस खात्यातील श्वान हा दुसरा पोलीस कर्मचारीच...अनेक अशा प्रकरणात त्याची महत्त्वाची भूमिका असते. नांदेडमध्ये अशाच एका प्रकरणात रॅम्बो नावाच्या श्वानाने एका मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या. किनवट येथे भरदिवसा झालेल्या महिला मुख्याध्यापिकेच्या हत्येचा उलगडा झाला. मयत सुरेखा राठोड यांचा खून त्यांचा पती विजय राठोड याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी विजय राठोडने मोठ्या शितिफीने पत्नीचा खून करून शांतता पाळली होती. पण पोलिसांना विजय राठोडसह सात जणांवर संशय होता. पोलिसांनी जेव्हा ओळख परडे घेतली तेव्हा रॅम्बो बरोबर आरोपजवळ गेला आणि भुंकू लागला. पोलीस कर्मचाऱ्याने पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी आरोप विजय राठोडकडे नेलं पण पुन्हा रॅम्बोने तेच केलं. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच विजय राठोडने खुनाची कबुली दिली. विजय राठोड हा एका आश्रमशाळेत शिक्षक आहे. तसंच तो राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या आहे. राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या प्रकरणात पोलिसांनी विजय राठोडसह त्याची प्रेयसी आणि अन्य चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading