• होम
  • व्हिडिओ
  • राम मंदिराआधी गरिबांना घास द्या - नाना पाटेकर
  • राम मंदिराआधी गरिबांना घास द्या - नाना पाटेकर

    News18 Lokmat | Published On: Dec 2, 2018 09:57 PM IST | Updated On: Dec 2, 2018 10:00 PM IST

    पुणे, 2 डिसेंबर - 'नाम' संस्थेच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन केलं आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, अशा परिस्थितीत ''एक मुठ धान्य आणि एक पेंढी चारा'' अशा प्रकारची मदत दिल्यास शेतकऱ्यांना हातभार लागेल, असं आवाहन नाना पाटेकर यांनी राज्यातील जनतेला केलंय. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या स्थलांतरणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. हा प्रश्न सोडवण्यात सरकार अपुरं पडत असेल, तर आपण त्यांना मदत करू असंही नाना म्हणाले. दरम्यान, राम मंदिराच्या आंदोलनावरून नानांनी जोरदार टीका केली. कोणी काय करायचं काय नाही हे ज्याचं त्याने ठरवावं. ज्याला मंदिर बनवायचं त्यांनी ते बनवावं, पण त्याआधी गरिबांचं पोटं भरणं आवश्यक आहे. राम मंदिर बांधण्याआधी गरिबांना घास द्या असं ते यावेळी म्हणाले. पुण्यातल्या खडकवासला धरणातील गाळ उपसण्यासाठी 'ग्रीन थम' या संस्थेला 25 पोकलेन देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी संस्थेच्यावतीने नानांना भेट म्हणून एर गायीचं वासरू देण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी