नागपूर, 22 जानेवारी : जगभरात आँरेज सिटीच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नागपुरात चार दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचा थाटात समारोप झाला. संत्र्याचे शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरात लोकमतच्या पुढाकाराने आयोजित 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'मध्ये गेली चार दिवस हजारो लोकांनी भाग घेतला. या ऑरेंज फेस्टीव्हलमध्ये कार्निव्हल परेड, संत्र्याच्या विविध कलाकृती आणि फायर शो सुद्धा आयोजित करण्यात आला होता. लोकमतच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये हजारो लोकांनी सहभाग नोंदवला. समारोपाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्याचे उर्जा, उत्पादनशुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार असल्याची घोषणा केली