• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत
  • VIDEO : धावत्या ट्रकखाली त्याने दिले झोकून,थरकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्हीत

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2018 07:31 PM IST | Updated On: Jul 26, 2018 07:31 PM IST

    नागपुरच्या गिट्टीखदान चौकात धावत्या ट्रकच्या खाली झोकून जीव दिल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही व्यक्ती कोण होती आणि हे पाऊल का उचलले यासंदर्भात कुठलीही माहिती पुढे येऊ शकली नाही. एक ट्रक कामठी कडून एलआयसी रोडकडे जात असतांना मेट्रोच्या कामामुळे ट्रकची गती ड्रायव्हरने कमी केली. त्याचवेळी ४० ते ४५ वर्षाच्या वयाची एक व्यक्ती ट्रकच्या चाकात घुसली आणि यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हे सर्व इतके अचानक घडले कुणाला काहीच समजले नाही. ट्रकमध्ये मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारी मिनी क्रेन ठेवली होती. घटनेची माहिती होताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ट्रकचा शोध घेतला. ट्रक चालकच्या निष्काळजीमुळेच अपघात झाल्याचे सर्वांना वाटत होते. पोलिसांनी गड्डीगोदाम चौकातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. ते पाहिल्यावर खरा प्रकार लक्षात आला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. मृताची ओळख पटू शकली नाही. त्याच्या हातात ब्रेसलेट आहे. त्यात पंकजा असे लिहिलेले आहे. छातीवर उजव्या बाजूला इंग्रजीत ‘एन’ आणि डाव्या बाजूला ‘नीत’ असे गोंदलेले आहे. त्याने कथ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी