• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नगरमध्ये सिने स्टाईल हाणामारी; भर दिवसा निघाल्या तलवारी
  • VIDEO : नगरमध्ये सिने स्टाईल हाणामारी; भर दिवसा निघाल्या तलवारी

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 08:39 PM IST | Updated On: Jan 5, 2019 08:44 PM IST

    अहमदनगर, 5 जानेवारी : अहमदनगरमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तलवारी आणि लोखंडी रॉडनं हाणामारी झाली. या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. एखाद्या अॅक्शन चित्रपटाप्रमाणे शनिवारी नगर शहरातील वंजारी गल्लीत हा प्रकार घडला. या मारामारीनंतर संबंधित दुचाकीही पेटवून देण्यात आली. हा सर्व प्रकार जवळच्या एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन भर दिवसा रस्त्यात दहशत माजवणाऱ्या या आरोपींपैकी काही आरोपी हे नगरसेवकाच्या जवळचे असल्याची चर्चा आहे. हा प्रकार खरंच क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून घडला? की दहशत पसरविण्यासाठी? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading