• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हवालदार मामांनी घेतलं हातात फावडं,बुजवले खड्डे
  • VIDEO : हवालदार मामांनी घेतलं हातात फावडं,बुजवले खड्डे

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2018 10:13 PM IST | Updated On: Aug 23, 2018 11:14 PM IST

    ठाणे, 23 आॅगस्ट: एकीकडे रस्त्यावंरील खड्डे जो पर्यंत बुझत नाही तो पर्यंत मतदान करणार नाही असा पवित्रा ठाण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांनी घेतला असताना आता रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ होतेय, वाहतूक कोंडी होतेय. रस्त्यांवरील खड्डे कधी बुझवणार याची वाट न पाहता ठाणे वाहतूक पोलिसांनी स्वत:च हातात फावडे घेऊन खड्डे बुझवतायेत. यामुळे वाहतूक नियंत्रणा सोबतच रस्त्यांवरील खड्डे बुझवणे हे काम देखील आता ठाणे वाहतूक पोलीस करू लागलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एमएसआरडीसीचे मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असून देखील रस्त्यांवरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालाल्याने मंत्री एकनाथ शिंदे नक्की करतात तरी काय? असा प्रश्न आता ठाणेकर करतायेत. आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलीस बुझवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस स्वत:च्या संपर्कातील एका व्यक्तींच्या साह्यायाने सिमेंट मिक्सरमधून खड्डा बुझवण्याकरता सिमेंट मिक्सचर टाकत होते. तर एक वाहतूक पोलीस हातात फावडा घेऊन त्याने सिमेंट नीट खड्ड्यात भरत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी