• VIDEO : दहा महिन्यानंतर मोनोरेल परत धावली

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2018 08:51 PM IST | Updated On: Sep 1, 2018 09:19 PM IST

    मुंबई, 1 सप्टेबर : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासुन मोनोरेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालीय. मुंबईत वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी 'एमएमआरडीए'नं मोनोरेल सुरु केली खरी. मात्र, सततच्या अपघांतामुळं ती कधी सुरळीत धावलीच नाही. तब्बल 10 महिन्यांनी मोनोरेलचा पहिला टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरु झालाय. नोव्हेंबर 2017 मध्ये आग लागल्यामुळे मोनो रेलची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षाविषयक बदल करून आजपासून मोनोरेलचा पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर दरम्यान सुरु झालाय. नव्याने सुरू झालेली मोनोरेल वडाळा ते चेंबूर दरम्यानच धावणार आहे. वास्तविक पाहता या भागातील नागरिकांना मुंबईच्या मुख्या प्रवाहात येण्यासाठी कुर्ल्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. कुर्ला रेल्वेस्थानक चेंबरपासून केवळ कही कि.मी. अंतरावर आहे. नव्या टप्प्यात मोनोरेल नक्कीच कुर्ल्यापर्यंत धावणार अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना होती. मात्र, त्यासाठी मोनोरेलच्या प्रावाशांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading