'लोकलच्या दारात उभं राहु नका', अशी सुचना वारंवार रेल्वेकडून देण्यात येत असते. पण काही महाभाग हे आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत असतात. काही तरुण हे धावत्या लोकलमधून बाहेर माकड उड्या मारत स्टंट करत असतात. आता तर यात महिलाही मागे नाही. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. यात एक तरुणी लोकलच्या दारात स्टंटबाजी करताना दिसत आहे. सीएसटीएम वरून वाशीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही तरुणी लोकलच्या दारात स्टंट करताना दिसत आहे. ही तरुणी रे रोडवर लोकलमध्ये चढली होती. त्यानंतर काॅटन ग्रीन स्टेशनवर या तरुणीने लोकलमधून उडी मारून पसार झाली.